कारवाईबाबत चालढकल ः खेड कृषीविभाग हप्ते वसुली प्रकरण
दावडी – खेड तालुका कृषी अधिकारी राजरोस हप्ते वसुली करत असल्याची बातमी दैनिक प्रभातमध्ये प्रसिद्ध केल्यानंतर या बातमीच्या आधारावर तालुका कृषी अधिकारी यांनी केलेली वसुली रक्कम पुन्हा कर्मचाऱ्यांना मागे देण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांनी दैनिक प्रभातचे आभार मानले आहे.
खेड तालुका कृषी अधिकारी यांची कर्मचाऱ्यांकडून राजरोस हप्ते वसुली सुरू असल्याची बाब दैनिक प्रभातने समोर आणली होती; मात्र वरिष्ठ अधिकारी फक्त चौकशी सुरू असल्याची कारणे गेली एक महिन्यापासून देत या प्रकरण दाबण्याचे प्रकार करता होते; मात्र उपविभागीय कृषी अधिकारी यांना याबाबत विचारणा करूनही याबाबत अहवाल सादर झाला नसल्याचे सांगण्यात आले;
मात्र अहवाल सादर करण्यापूर्वीच तालुका कृषी अधिकारी वाणी यांनी मागील महिन्यात केलेली वसुली पुन्हा देण्यास सुरुवात केली असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दैनिक प्रभातला दिली. त्यामुळे आपल्याच खिशातील कापलेले पैसे पुन्हा मिळाल्याने कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.
खेड कृषी अधिकारी नंदू वाणी यांच्याकडून याच विभागातील कर्मचारी यांच्याकडून राजरोसपणे वसुली सुरू होती. याला चपराक लावण्यासाठी दैनिक प्रभातने पाठपुरावा करून हे वृत्त प्रसिद्ध केले होते; मात्र वृत्त प्रसिद्ध करूनही वरिष्ठांचा वरदहस्त असल्याने कोणतीही कारवाई होणार नसल्याची माहिती वाणी हे कर्मचारी वर्गाला देत होते;
मात्र दैनिक प्रभातने वेळोवेळी पाठपुरावा केल्याने आणि वसुली करणारे तालुका कृषी अधिकारी नंदू वाणी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी दैनिक प्रभातने लावली होती. कारवाई होऊ नये, यासाठी केलेली वसुली रक्कम एक महिन्यानंतर पुन्हा कर्मचाऱ्यांना देणे सुरू केले आहे.
कृषी अधिकारी नंदू वाणी यांनी लोकप्रतिनिधी यांचे नाव पुढे करून ही वसुली सुरू केली होती. यानंतर कर्मचाऱ्यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांना निवेदन दिले होते तरीदेखील कोणतीही कारवाई झाली नाही. आपल्यावर कारवाई होऊ नये. यासाठी केलेली वसुली पुन्हा मागे दिलीय जात असून आता या वसुली अधिकाऱ्यावर कोणती कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. आणखी काही कर्मचाऱ्यांचे जबाब घेणे बाकी आहे; मात्र अशा प्रकारे वसुली केली जात असेल तर अशा अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल.
-सतीश शिरसाट, उपविभागीय कृषी अधिकारी