पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कुटुंब कल्याण विभागचे सहायक संचालक डॉ. सचिन देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी सोमवारी हा पदाचा पदभार स्वीकारला.
यापूर्वीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांची बदली झाली होती. परंतु त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. डॉ. देसाई हे मूळचे बारामतीचे आहे.
त्यांनी यापूर्वी पुणे जिल्हा परिषदेमध्ये बारामती आणि इंदापूर तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांवर वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने आजच बदलीचे आदेश काढले. त्यानंतर लगेचच डॉ. देसाई यांनी आरोग्य अधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारल्याने जिल्हा परिषदेत चर्चारंगली होती. सध्या कालावधी पूर्ण न होताच अधिकाऱ्यांची बदली होत असल्याने आश्चर्य व्यक्त जात आहे.