श्रीक्षेत्र नारायणपूरात चंद्रभागा कुंडात पादुकाभिषेक
दत्त जयंती सोहळ्याची ग्रामप्रदक्षिणेने सांगता
गराडे – नारायणपूर (ता. पुरंदर) येथे श्री दत्तमंदिरात सुरू असलेल्या तीन दिवसांच्या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता आज (दि. २६) चंद्रभागा कुंड येथे पादुकाभिषेकाने करण्यात आली.
नारायणपूर येथे नारायण महाराज यांच्या दत्तमंदिरात तीन दिवसीय दत्त जन्म सोहळा उत्साहात पार पडला असून, आज (दि. २६) पहाटे ४ ते 6 पर्येंत नारायणेश्वर (महादेव) मंदिर आणि श्री दत्त मंदिरात रुद्राभिषेक झाला. सकाळी 6 ते 8 यावेळेत पौर्णिमा होमहवन झाल्यावर 8-30 ते 9 या वेळेत आरती झाली. यानंतर 9 वाजता पालखीत श्रींच्या पादुका व मुखवटे ठेवून सवाद्य ग्रामप्रदक्षिणेला सुरुवात झाली.
या पालखी सोहळ्यात हत्ती, घोडे न ठेवता हलगी, झंझ पथाक व भजन ठेवण्या आले होते. पालखी ठीक 10-30 वाजता स्नानासाठी चंद्रभागा कुंडाजवळ आल्यावर पादुका व मुखवट्यांना विधिवत स्नान घालण्यात आले. यात सुरुवातीला कुंडात श्रीफळं व फुल सोडून पाणी शुद्ध करून ब्रह्मा, विष्णू, महेश, दत्त महाराज पादुका व श्री गणेश महाराज यांचा अभिषेक व पूजन विजय सूर्यवंशी, दीपक पाटील, विजय पुरंदरे, आबासाहेब जगताप, तात्यासाहेब भिंताडे, गणेश सोनावणे, प्रकाश बाफना,
नाथा बोरकर, एम. के. नाना गायकवाड, महादेव जाधव, मारुती सस्ते यांनी पोपट महाराज स्वामी व भरतनाना क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तीची विधिवत पूजा करून स्नान झाले. नंतर पुन्हा ग्रामप्रदक्षिणेला सुरुवात करून. पालखी 1.30 वाजता मंदिरात आल्यावर आरती करून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले.
यावेळी भाविकांना दिवसभर महाप्रसादही ठेवल्याची माहिती मंदिराचे व्यवस्थापक भरतनाना क्षीरसागर यांनी दिली. सायंकाळी 4 ते 6 या वेळेत सर्वच ढोल पताका व झाज पतकांची व दिंड्या भजन या खेळांचा हजेरीचा कार्यक्रम झाला. रात्री 8 ते 11 या वेळेत श्री दत्त जयंती सोहळा, प्रवचन व भजन करून आरतीने सोहळ्याची सांगता झाली.