हर्षद वाळके अव्वल : निकालाची परंपरा कायम
पाबळ – सीबीएसई बोर्डाने दहावीचा निकाल जाहीर केला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बालाजी इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल 100 टक्के लागला. हर्षद वाळके याने 93.60 टक्के गुण मिळवून शाळेत अव्वल स्थान पटकावले तर रुद्रा जगताप 93.2, सार्थक रोडे 92.6, सुजल पानसरे 91.2, धनश्री पवार ९०.८, पियुष लंघे 90.2, दिया हा 89.2, सानिका घावटे 88.8, करिष्मा छाजेड 86.4, तर कल्याणी पवार 85.2 टक्के अनुक्रमे नंबर पटकावले आहेत.
इंग्रजी या विषयामध्ये रुद्रा जगताप 95, धनश्री पवार 93, श्रुती सोनवणे 93, जिया शेख 92, सुजल पानसरे ९२, हर्षल वाळके 91, सार्थक रोडे 91, सानिका घावटे 90 असे गुण मिळाले. सोशल सायन्स या विषयांमध्ये हर्षद वाळके 100, सुजल पानसरे 99, धनश्री पवार 97 ,सार्थक रोडे 96, पियुष लंघे 95, रूद्रा जगताप 94, सानिका घावटे 94, दिया हार्दे 93, सिद्धेश काळे 92, करिष्मा छाजेड 90, त्याचप्रमाणे हिंदी विषयात हर्षद वाळके 97, जिया शेख 96, पियुष लंघे 96, रुद्रा जगताप 96, धनश्री पवार 95, सानिका घावटे 95, सार्थक रोडे 95, करिष्मा छाजेड 93, श्रुतिका शिंदे 93, आयुष पांडे 92, कल्याणी पवार 91, श्रुती सोनवणे 91, जानवी जगदाळे 90, सुजल पानसरे 90 गुण पटकावले.
विज्ञान या विषयात हर्षद वाळके 88, सार्थक रोडे 87, पियुष लंघे 84 , रुद्रा जगताप 83, धनश्री पवार 81, सुजल पानसरे 81 गुण मिळवले. गणित या विषयांमध्ये आयुष पांडे 91, हर्षद वाळके 88, सार्थक रोडे 88, रुद्रा जगताप 87, पियुष लंघे 83 मार्क मिळवून यशस्वी झाले.
बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन सदाशिव पवार, प्राचार्य गणेश मिटपल्लीवार, उपप्राचार्या प्रणिता शेळके यांनी यशस्वी मुलांचे तसेच मेहनत घेतलेल्या शिक्षकांचे अभिनंदन केले केले.
विद्यार्थ्यांकडून कसून सराव
बालाजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीच्या मुलांवर शिक्षकांकडून विशेष मेहनत करून घेतली जाते.
स्कूलमध्ये वर्षभर पाठानुसार चाचण्या घेतल्या जातात. बोर्ड परीक्षेच्या पूर्वी दोन सराव परीक्षा घेतल्या जातात. प्राचार्यांद्वारे विद्यार्थ्यांचे मासिक मूल्यांकनही केले जाते. प्रत्येक विषयाकडे वर्गशिक्षक तसेच विषय शिक्षक यांच्याकडून वैयक्तिक लक्ष दिले जाते.