बोपगाव ते श्रीक्षेत्र कानिफनाथ गड काढली मिरवणूक
गराडे : श्री राम प्रभूंच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या पावन मुहूर्तावर पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील श्रीक्षेत्र कानिफनाथ गडावरील श्रीराम मंदिराच्या कलशारोहणाचा सोहळा सोमवारी (दि. 22) मोठ्या उत्सवात पार पडला.
श्रीक्षेत्र कानिफनाथ गडावरील श्रीराम प्रभू यांचे मंदिर बाधण्यात आलेले असून त्यात श्रीराम प्रभू, सीतामई, लक्ष्मण व हनुमान यांची प्राणप्रतिष्ठापण केलेली होती. परंतु त्याचे कळसारोहणाचा कार्येक्रम अयोध्यातील रमलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठानचा मुहूर्त साधत केला. याच निमित्ताने बोपगावातील ग्रामदैवत कालभैरवनाथ मंदिरापासून रविवारी (दि. 21) दिवशी कलशाची मिरवणूक बोपगाव ते श्रीक्षेत्र कानिफनाथ गड अशी काढण्यात आली.
तर सोमवारी बोपगाव गावामध्ये प्रत्येक घरापुढे रांगोळी काढून घरावरती भगव्या पताकांची गुढी उभारण्यात आली होती. या मिरवणुकीसाठी गावातील 40 बैलगाड्या सजवून बोपगाव ते कानिफनाथ गड अशी कलश मिरवणूक काढली होती. गावचे पारंपरिक नृत्य, छबिना, लेझीम पथक यांच्या तालावरती मिरवणूक काढण्यात आली होती.
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन समस्त ग्रामस्थ बोपगाव ग्रामपंचायत बोपगांव,आणि नवनाथ देवस्थान पंच कमिटी यांनी केले होते. यावेळी अध्यक्ष ज्ञानोबा फडतरे, उपाध्यक्ष दीपक फडतरे, जयवंत फडतरे, नागेश फडतरे, शिवाजी जगदाळे, प्रकाश फडतरे,
प्रकाशभाऊ फडतरे, सुरेश फडतरे, महादेव फडतरे, नितीन फडतरे, रमेश फडतरे, मंगेश फडतरे, सोनबा फडतरे, बापूसाहेब सतव पाटील, संजय राठोड यांचा कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.