पुणे – दुचाकी चोरणाऱ्या सराईतास गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथक एकच्या पोलिसांनी अटक केली. अक्षय दिपक पाठक (वय 26, रा. दत्तवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर स्वारगेट, दत्तवाडी येथे प्रत्येकी दोन, तर खडक येथे एक गुन्हा दाखल आहे.
शहराच्या हद्दीत खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी हवालदार रविंद्र फुलपगारे यांना बातमी मिळाली की, एक व्यक्ती चोरीची दुचाकी घेऊन दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत फिरत आहे. या माहितीनुसार पोलीस पु. ल. देशपांडे उद्यान समोर, नवश्या मारुती चौकाजवळ , सिंहगड रोड येथे सापळा थांबले. तेथे काळ्या रंगाची होंडा शाईन दुचाकी घेऊन एकजण येताना दिला.
पोलिसांनी त्याला थांबण्यास सांगितले. त्यावेळी तो न थांबता पळून जावू लागला. त्यास थांबण्यास लावून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने त्याच्याजवळील होंडा शाईन दुचाकी तो राहत असलेल्या दत्तवाडी येथील अनंत कृपा सोसायटीच्या पार्किंगमधून चोरी केल्याचे सांग़ितले.
गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, पोलीस अंमलदार पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबसे, मधुकर तुपसौंदर, रविंद्र फुलपगारे, रमेश चौधर, नितीन कांबळे,गजानन सोनवलकर, दुर्योधन गुरव यांनी ही कारवाई केली.