रेडा – इंदापूर तालुक्यातील मौजे देवकर लोणी येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत वाय ऍक्सेस स्ट्रक्चरल स्टील प्रायवेट लिमीटेड कंपनीचे उद्योजक अशोक जिंदाल यांनी खासदार उदयनराजे यांच्या संदर्भात अपशब्द वापरले, त्यांना गुंड संबोधले याच्या निषेधार्थ शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी जिंदाल यांच्या तोंडाला काळे फासले. याप्रकरणी सात जणांवर, व चार ते पाच अनोळखी इसमावर इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, (ता 24) रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास लोणी देवकर येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथील एमआयडीसी मध्ये येथील प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चे मालक अशोक संवरलाल जिंदाल यांनी छत्रपती उदयनराजे यांचे सोबत अपशब्द वापरले चे निषेधार्थ शिवधर्म फाउंडेशन या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक उर्फ अण्णा सिताराम काटे,(वय28वर्ष रा इंदापूर) व त्याचे सोबत भगवा झेंडे हातात घेतलेले शिवधर्म फाऊंडेशन या संघटनेचे आरोपी सात जन, तसेच 4 ते 5 अनोळखी कार्यकर्ते यांनी बेकायदेशीर जमाव जमवून कोरोना महामारीत स्वतःचे तोंडाला मुख पट्टी लावली नाही.
तर कोरोना या रोगाचा प्रसार होऊन जनसामान्य जनतेचे जीवितास धोका होऊ शकतो. हे माहित असताना देखील स्वतःचे तोंडाला मुख पट्टी न बांधता अशोक जिंदाल याला हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. व तोंडाला काळे फासले त्यामुळे इंदापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिली.
या गुन्हयामधिल मधील आरोपी दिपक उर्फ अण्णा सिताराम काटे, अमोल अंकुश पवार (वय 25 वर्ष अकलूज ता माळशिरस जि सोलापूर), कुणाल शिवाजी चव्हाण (वय 33 वर्ष रा अकलूज ता माळशिरस जि सोलापूर), प्रदीप चंद्रकांत भोसले (वय 24 वर्ष रा राऊत नगर अकलूज) व किरण रवींद्र साळुंखे (वय 27 वर्षे रा भाग्यनगर भवानीनगर ता इंदापूर), अक्षय चंद्रकांत चव्हाण (वय 25 वर्ष रा.श्रीराम नगर भिगवण रोड बारामती) सुनील विठ्ठल रायकर (वय 23 वर्ष राऊत नगर, अकलूज) अशा सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
इंदापूर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 599/2021 असून भादवि कलम 143.147.149.323.269.270. सह म पो का क 36.135. आपत्ती व्यवस्थापन कायदा सन 2005 चे कलम 30.33.34.41.51 सह भारतीय साथ रोग अधिनियम 1857चे कलम 3.4 लावण्यात आली आहेत.
या घटनेची फिर्याद अमोल रामदास गारुडी पो.कॉ. 2708 नेम इंदापूर पोलीस स्टेशन यांनी दिली असून, या घटनेचा तपास इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
अशोक जिंदाल यांच्यावर ठोस कारवाई करावी –
उद्योजक अशोक जिंदाल यांनी खासदार उदयनराजे यांच्याबाबत अपशब्द वापरले आहे आहेत त्यामुळे जिंदाल यांच्यावर ठोस कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवधर्म फाउंडेशन ने केली आहे.