Pune Crime: दारु पीताना वाद; मित्रानेच केला मित्राचा खून

पुणे – मित्रांसाेबत दारु पीत बसलेले असताना वाद हाेऊन मित्रांनीच मित्राचा खून केल्याची घटना सिंहगड राेड येथील सई हेरिटेज साेसायटीच्या मंदिराजवळ साेमवारी मध्यरात्री घडली आहे.  मंदार जाेगदंड (वय-२३,रा.साने गुरुजी वसाहत,पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी साेन्या खुळे, राजू काेतवाल, इजगद, चेतन बनसाेडे (सर्व रा. दत्तवाडी,पुणे) या आराेपीं विराेधात दत्तवाडी पाेलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शुभम दत्ता अडसुळ (वय-२३) याने पाेलीसांकडे फिर्याद दिली आहे. साेमवारी रात्री आराेपी इसम व मयत हे दारु पीत बसले हाेते.

त्यावेळी मंदार याने साेन्या खुळे यास शिवीगाळ केली. त्याचा राग मनात धरुन खुळे व त्याचे साथीदार मित्रांनी मंदार यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत मंदार याचा जागीच मृत्यु झाला आहे. याबाबत दत्तवाडी पाेलीस ठाण्याचे सहाय्यक पाेलीस निरीक्षक युवराज पाटील पुढील तपास करत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.