पुणे – भरधाव तीनचाकी टेम्पो उलटून टेम्पो चालकाचा मृत्यू झाला तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. ही घटना कात्रज नवीन बोगद्यामध्ये घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात मयत टेम्पो चालकाविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विजय अशोक रोकडे(23 रा. ग्रामपंचायतीजवळ, आंबेगाव खुर्द, पुणे) असे मृत टेम्पो चालकाचे नाव आहे. तर अपघातात त्याचा सहकारी े अक्षय अनंता शिंदे (25रा. साईदत्त निवासशेजारी, लेन नं. , टेल्को कॉलनी, आंबेगाव बु पुणे) हा जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार रोकडे हा शिंदेसह तीन चाकी टेम्पोतून कात्रज नवीन बोगद्यातून पुण्याकडे येत होता. यावेळी त्याचे भरधाव टेम्पोवरील नियंत्रण सुटले. यामुळे टेम्पो पलटी होऊन दोघेही गंभीर जखमी झाले. यामध्ये रोकडेचा मृत्यू झाला तर शिंदे याच्या दोन्ही पायाला गंभीर जखमा झाल्या.