पुणे – व्यवसायातील हिस्सा न दिल्याने भागीदाराच्या गुप्तांगाखाली चाकूने सपासप वार केले. यामध्ये भागीदार गंभीर जखमी झाला आहे. हडपसर पोलिसांत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. साबीर रशीद सय्यद (35, वैदवाडी, हडपसर) असे फिर्यादीचे नाव आहे.
तर अकिल सय्यद (42, रा.कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साबीर व अकिल यांचा व्यवसाय करोना काळात तोट्यात गेला होता. अकिलला भागीदारीतील 40 हजारांची रक्कम साबीरकडून येणे बाकी होते. त्याने साबीरकडे पैशांचा तगादा लावला होता.
मात्र, साबीरकडे पैसे नव्हते. याच रागातून अकिलने साबीरवर चाकूने सपासप वार केले. यानंतर त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. तपास सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड करत आहेत.