पुणे- गेल्या 24 तासांत नवे 964 करोनाबाधित आढळले असून, 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील पाच शहर हद्दीतील आहेत.
दिवसभरात 5 हजार 048 संशयितांची स्वॅब टेस्ट झाली आहे. याशिवाय 2 हजार 075 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. सक्रिय बाधितांची संख्या 11 हजार 950 असून, त्यात ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही कमी झाले आहे. सध्या 200 रुग्णांना ऑक्सिजन लावण्यात आले आहे.
याशिवाय 42 जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर 30 जणांना इव्हेसिव्ह व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे.
सक्रिय बाधितांमधील रुग्णालयात राहून उपचार घेत असलेल्यांची संख्या मात्र कमी झाली नाही, ती 6.59 टक्के आहे. आजपर्यंत 6 लाख 53 हजार 256 बाधितांमधील 6 लाख 31 हजार 997 बाधित बरे झाले आहेत. त्यातील 9 हजार 309 बाधित मरण पावले आहेत, असे पालिकेच्या अहवालात म्हटले आहे.