पुणे – छत्रपती संभाजी महाराज पुलावर मेट्रोचे गर्डर जोडण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हा पूल 28 डिसेंबरपर्यंत रात्री 11 ते सकाळी 8 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असेल. यादरम्यान वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. तर यशवंतराव चव्हाण पुलावरून फक्त दुचाकी वाहनांना ये-जा करण्याची मुभा आहे. वाहनचालकांना माहिती नसल्याने शुक्रवारी सकाळी वाहतुकीसाठी बंद ठेवल्याने या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.
असे आहेत पर्यायी मार्ग
खंडोजीबाबा चौक-टिळक रस्त्यासाठी पर्यायी मार्ग
खंडोजीबाबा चौक – कर्वे रोडने शेलारमामा चौक – यशवंतराव चव्हाण चौक – रसशाळा चौक – डावीकडे वळून एस.एम. जोशी पूल – गांजवे चौक येथून डावीकडे वळून टिळक चौक किंवा उजवीकडून शास्त्री रस्त्याने दांडेकर पुलामार्गे इच्छितस्थळी जावे.
खंडोजीबाबा चौकाकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग
टिळक चौक – केळकर रोड – एलआयसी बिल्डिंग – बालमुकुंद लाहोटी चौक – श्री हरी पवार चौक – कासट कॉर्नर – माती गणपती चौक – नारायण पेठ पोलीस चौकी – केसरीवाडा – रमणबाग शाळा चौक – डावीकडून वर्तक बाग – कॉसमॉस बॅंक चौक (शनिवार पेठ पोलीस चौकी) – बालगंधर्व पुलावरून सावरकर भवन – डावीकडे वळून जंगली महाराज रोडने खंडोजीबाबा चौक.