पुणे – शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरातील काही रस्त्यांवर दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे हे रस्ते बंद झाल्यानंतर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बस मार्गात तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे. शहरातील रस्ते बंद झाल्यावर शनिवारवाडा ते सिंहगड या मार्गावरील बस क्रमांक 50 ही बस स्वारगेट येथून सुटेल. तर बस मार्ग क्र. 113 अ.ब. चौक ते सांगवी या मार्गाच्या बसेस म.न.पा. भवन स्थानकावरून सुटतील. बस मार्ग क्र. 8, 9, 57, 94, 108, 143, 144, आणि 144 अ या मार्गाच्या सर्व बस जाता-येता डेक्कन जिमखाना, म.न.पा. भवन, गाडीतळ (जुना बाजार) या मार्गाने सुटतील.
दि. 6 आणि 7 सप्टेंबरला रस्ता बंद झाल्यावर मार्ग क्र. 174 ही बससेवा गाडीतळ (जुना बाजार) म.न.पा., डेक्कनमार्गे जाईल. बस मार्ग क्र. 2, 2अ, 10, 11, 11अ, 11क, 13, 13अ, 28, 30, 20, 21, 37, 38, 88, 216, 297, 298, 354 तसेच रातराणी-1, मेट्रो शटल-12 या मार्गाच्या बस शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे येताना जंगली महाराज रस्ता, डेक्कन, टिळक रस्तामार्गे पुढे येतील. तर स्वारगेटकडून शिवाजीनगरला जाताना वरील मार्गांवरील बस बाजीराव रस्त्याने संचलनात राहतील.
बस मार्ग क्र. 7, 197, 202 या मार्गावरील बस जाता-येता स्वारगेट, टिळक रोड या मार्गाने जातील तर बस मार्ग क्र. 68 जाता-येता स्वारगेट, टिळक रस्ता मार्गाने संचलनात राहतील. स्वारगेटकडून बस मार्ग क्र. 3 व 6 हे दोन बस मार्ग दिवसभरासाठी बंद ठेवण्यात येईल.