मुंबई – अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकताच पती निकचा ३० वा जन्म दिवस मोठ्या थाटात साजरा केला. या सेलिब्रेशनसाठी दोघेही एका छोट्या टूरवर गेल्याचे समजते. लॉस अँजेलिसमध्ये राहणारी ही जोडी जन्म दिवसानिमित्त अमेरिकेतील अरिझोनमध्ये गेले होते.यावेळी जन्म दिवसाची सेलिब्रेशन थीम गोल्फ क्लबवर आधारित ठेवण्यात आली होती.
निकच्या जन्म दिवसाच्या सेलिब्रेशनचा ग्रँड व्हिडीओ शेअर करत प्रियांकाने निकसाठी विश नोटही लिहिली आहे.माझ्या प्रिय व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझ्या आयुष्यात सदैव आनंद आणि चेहऱ्यावर हसू राहो. आय लव्ह यु” अशा आशयाचे कॅप्शन देत प्रियांकाने सोशल मीडियावर निकला जन्म दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
प्रियंका चोप्राने तिच्या पोस्टमध्ये निकच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या तयारीत मदत करणाऱ्यांची नावेही नमूद केली आहेत. प्रियांकाच्या या विश पोस्टवर निकनेही लगेच प्रतिक्रिया दिली. त्याने लाल हार्ट इमोजीसह लिहिले, “एपिक टाइम तू खरंच कमाल आहेस”. निक प्रियांकाच्या पार्टीच्या व्हिडिओवर चाहत्यांनी देखील भर भरून शुभेच्छा दिल्या आहेत.