रश्मिका मंदानाला बॉलीवूडमधील तिसरा सिनेमा मिळाला आहे. यापूर्बी “मिशन मजनू’तून तिचे पदार्पण होणार हे निश्चित झाले आहे आणि “गुडबाय’ हा दुसरा सिनेमा साईन केला आहे. “गुडबाय’मध्ये तर तिला चक्क अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करायचे आहे.
काही काळापूर्वी रॅपर बादशाह, युवान शंकर आणि उचाना अमित यांच्या एका म्युझिक अल्बममधील तिच्या परफॉर्मन्सचे सगळ्यांनीच कौतुक केले होते. आता तर तिला तिसरा सिनेमाही मिळाल्याचे समजते आहे.
एका लाईव्ह सेशनदरम्यान रश्मिका मंदानानेच याबाबत माहिती दिली. रश्मिका या तिसऱ्या सिनेमाबाबतचा तपशील मात्र सांगितलेला नाही. नॅशनल क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रश्मिका मंदानाला आतापर्यंत हिंदीमध्ये डब केलेल्या मूळ तेलगू सिनेमातूनच बघितले गेले आहे. पण आता ती लवकरच मुख्य प्रवाहातील हिंदी एन्टरटेन्मेंट फिल्ममध्येही दिसायला सुरुवात होणार आहे.