प्रियांका चोप्राचा वाढदिवस मियामीमध्ये

प्रियांका चोप्राने आपला वाढदिवस मियामीमध्ये साजरा केला. निक जोनासव्यतिरिक्‍त आई मधु चोप्रा, चुलत बहिण परिणिती चोप्रा आणि इतर अनेक मित्र परिवारासोबत तिने आपली सुटी मस्त एन्जॉय केली. आपल्या या सुटीमध्ये प्रियांकाने वॉटर स्पोर्टसचा मनमुराद आनंद लुटला. या सुटीचे अनेक फोटो तिने सोशल मिडीयावर अपलोड केले आहेत.

यापैकी एका फोटोमध्ये ती पिंक बिकनीमध्ये वॉटर स्कूटर चालवताना दिसते आहे. पाण्याच्या लाटांवर स्वतःचा तोल सांभाळताना तिची त्रेधातिरपीट उडाली होती. एका अन्य फोटोमध्ये ती निक जोनासबरोबर शिडाच्या बोटीतून मस्त फिरतानाही दिसते आहे. तर आणखी एका फोटोमध्ये ती स्वतःचा तोल सांभाळता सांभाळता सेल्फी काढतानाची धडपदही स्पष्टपणे दिसते आहे. अशाच एका ठिकाणी भलामोठा केक कापून वाढदिवस साजरा करणारी प्रियांका आणि तिचे मित्रमंडळीही दिसत आहेत.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निकबरोबर लग्न झाल्यानंतरचा प्रियांकाचा हा पहिलाच वाढदिवस आहे. त्यासाठी मधु चोप्रा आणि परिणिती यांच्यासह चोप्रा कुटुंबतील अन्य सदस्य खास मियामीला गेले होते. जोनास आणि चोप्रा कुटुंबीयांशी संबंधित शेकडो जणांनी सोशल मिडीयावरूनच प्रियांकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)