मुंबई- “करोनामुळे सर्वांना जबरदस्तीची सुट्टी मिळाली आहे.” असं वक्तव्य अभिनेत्री प्रिती झिंटा हिने केलं आहे. त्यासंदर्भातील तिने सोशल मीडियावर एक व्हीडिओ केला आहे.
A lot has changed around us the past couple of days. Life on our planet has literally come to a STOP as “Coronavirus” spreads rapidly across the globe. Prevent the spread of this virus & protect yourself, family & your country. #CoronavirusOutbreak #COVID2019 #staysafe #ting pic.twitter.com/xK5ulotIAS
— Preity G Zinta (@realpreityzinta) March 17, 2020
मला माहिती आहे की कोणीही आनंदी नाही. करोनामुळे सर्वांना जबरदस्तीची सुटी मिळाली आहे. परंतु घरातच राहा आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करा. स्वच्छता राखा आणि इतरांनाही स्वच्छतेबाबत जागरुक करा. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत करा. अनेकदा आपण म्हणतो की सुटी मिळत नाही. पण आता सुटी मिळालीच आहे तर ती साजरी करा. मात्र सावधगिरी राखूनच.” अशा सुचना प्रितीने या व्हिडीओमार्फत आपल्या चाहत्यांना केल्या आहेत.
दरम्यान, प्रिती झिंटा ही सोशल मीडिया फार सक्रिय नसते. मात्र ती पोस्टच्या माध्यमातून कायम चाहत्यांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.