नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी महात्मा गांधींना त्यांच्या 74 व्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली. या निमीत्त जारी केलेल्या संदेशात त्यांनी म्हटले आहे की, त्यांचे उदात्त आदर्श आणखी लोकप्रिय करण्याचा आम्ही व्यापक प्रयत्न करीत आहोत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी शहीद दिन म्हणून पाळली जाते. आज, शहीद दिनानिमित्त, ज्यांनी धैर्याने आपल्या देशाचे रक्षण केले त्या सर्व महानांना आदरांजली अर्पण करतो. त्यांची सेवा आणि शौर्य सदैव स्मरणात राहील, असेही मोदींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमीत्त आदरांजली वाहण्यासाठी देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राजघाटावरही त्यांच्या समाधी स्थळी जाऊन अनेकांनी त्यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली.