मुंबई – शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याने त्यांचं निधन झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई-पुणे महा मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
या अपघातानंतर विनायक मेटेंना गंभीर अवस्थेत तातडीनं कामोठेतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत . मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आल्याची माहिती भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे.
विनायक मेटे आपला एक सहकारी आणि बॉडीगार्ड यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. आज दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी ते मुंबईला जात होते.