आरोग्यदायी इमारतींना प्राधान्य द्या (भाग-३)

दिवसभराच्या धावपळीतून आणि प्रदूषणाच्या वातावरणात राहिल्यानंतर सायंकाळी घरी आल्यानंतर मनाला शांती लाभावी आणि आरोग्यदायी वातावरण लाभावे, अशी अपेक्षा बाळगली जात आहे. त्यामुळेच इमारतीत व्हेंटिलेशन, एअर कंडिशनिंग, घरातील खेळती हवा, स्वच्छ प्रकाश, ग्रीन गॅसचे उत्सर्जन आदींची काळजी घेतली जात आहे.

आरोग्यदायी इमारतींना प्राधान्य द्या (भाग-१)

आरोग्यदायी इमारतींना प्राधान्य द्या (भाग-२)

आव्हाने : बहुतांश शहरातील हवापाणी खराब झाले आहे. या आधारावर नागरिकांना अधिकाधिक स्वच्छ हवा आणि पाणी मिळेल यासाठी बिल्डर प्रयत्नशील असून त्यादृष्टीने प्रयत्न करत आहेत. या प्रकरणात सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्टिफिकेशन म्हणजेच लीड. वेल बिल्डिंग स्टॅंडर्ड, ग्रीन गाईड फॉर हेल्थ केअर आदी इमारतीतील अंतर्गत भागात हवेची गुणवत्ता चांगली राहावी यावर भर दिला जात आहे. अर्थात, भारत हा असा एकमेव देश आहे की दीर्घकाळ अस्तित्वात राहील, अशी एकही इमारत तयार झालेली नाही. याचाच अर्थ आगामी काळात इमारतीचे बांधकाम जोरात सुरू होईल आणि त्यातून धूळ, मातीचा त्रास अधिक होईल. त्या तुलनेत प्रदूषणही वाढेल. बांधकामात धुळीचे प्रदूषण हे सर्वाधिक धोकादायक आणि चिंताजनक ठरत आहे. आता नागरिकांची जागरुकता वाढली आहे. त्याचा निपटारा करण्यासाठी बिल्डर अणि नागरिकांकडून पावले उचलली जात आहेत.

कोणत्या गोष्टी आवश्‍यक : वाढते प्रदूषण, पर्यावरणाची हानी लक्षात घेता ते रोखण्यासाठी भारतात सुमारे 14 लाख घरांना ग्रीन बिल्डिंगचे रूप देण्याचे काम केले जात आहे. या प्रयत्नात 6.33 अब्ज चौरस फूट जागा ही पर्यावरणपूरक म्हणून विकसित केली जाणार आहे. 2022 पर्यंत 10 अब्ज चौरस फूट जागेला ग्रीन बिल्डिंग रूपातून विकसित करणे हे उद्देश आहे. यातून देशात ग्रीन फूटप्रिंट 10 टक्‍क्‍यापर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. 752 लीड सर्टिफाइड (लीडरशीप इन एनर्जी अँड एन्वायरमेंटल डिझाइन) प्रकल्पाचा विचार केल्यास चीन, कॅनडा आणि भारत तिसऱ्या स्थानावर आहे.

संधी : इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी)च्या अंदाजानुसार 2025 पर्यंत देशात ग्रीन बिल्डिंग प्रॉडक्‍टस तसेच तंत्रज्ञानाचा बाजार हा 300 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल. ग्रीन बिल्डिंग्जमध्ये ऊर्जा कमी लागते तसेच स्रोतांना प्रोत्साहन मिळते. ही इमारत सौर ऊर्जेला प्राधान्य देते. फ्लशिंगसाठी रिसायकलिंगच्या पाण्याचा वापर केला जातो. या इमारत हवा शुद्ध करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यातून खराब हवा देखील शुद्ध होते. तसेच हानिकारक गॅसला देखील इमारतीपासून दूर ठेवते.

– श्रीकांत देवळे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.