Prathamesh Parab : टाइमपास या चित्रपटातील अभिनेता प्रथमेश परब लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरसोबत नात्याची जाहीर कबुली दिली होती. त्यानंतर आता क्षितीजाने सोशल मीडियावर खास पोस्ट करुन ते दोघे साखरपुडा करणार असल्याची माहिती दिली आहे.
प्रथमेशच्या गर्लफ्रेंडने सोशल मीडियावर तिचे प्रथमेशसोबतचे फोटो पोस्ट केलेत. सोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “14.2.2024 Valentine’s Day चं आमच्या relationship मध्ये special स्थान आहे. म्हणजे individually आम्ही Valentine’s day वगैरे या concept वर कधी फार believe नाही करायचो, नेहमी च्या दिवसा सारखाचं तोही एक दिवस, त्यात इतकं काय खास? पण कधीकधी खास न वाटणाऱ्या गोष्टीच खूप खास बनतात.”
View this post on Instagram
क्षितीजा पुढे लिहीते, “14 फेब्रुवारी 2020- माझी Valentine’s Day special photoshoot series बघून प्रथमेशने मला पहिल्यांदा मेसेज केला. 14 फेब्रुवारी 2021- We had started our relationship.. 14 फेब्रुवारी 2022- Completed 1 year with so many memories 14 फेब्रुवारी 2023- आमच्या relationship बद्दल social media वर officially announced केलं. 14 फेब्रुवारी 2024 ला आमच्या relationship ला 3 वर्षे पूर्ण होत आहेत मग आता काहीतरी special केलंच पाहिजे ना!! म्हणून… 14 फेब्रुवारी 2024 ला आम्ही engagement करायचं ठरवलंय.” शेवटी तिने लिहिले की लग्नाची तारीख अजूनही गुलदस्त्यातच आहे बरं का!” सध्या प्रथमेश आणि क्षितीजा पुढील महिन्यात लग्न बंधनात अडकणार आहेत. मात्र त्यांनी अद्याप लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रथमेश आणि क्षितीजाच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या पोस्टमध्ये प्रथमेशने क्षितीजा ठरलंय बाकी तारीख लवकरच कळवतो, असे सांगितले होते. त्यानंतर क्षितीजने 14 फेब्रुवारी 2024 रोजी साखरपुडा करणार असल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे.