मंचर-आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक येथील विद्या विकास मंदिर विद्यालयातील विद्यार्थी प्रणव बांगर याची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अशी माहिती विद्यालयाच्या वतीने देण्यात आली.
क्रीडा विभाग सेवा संचालनालय महाराष्ट्र व पुणे जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने नेवासा अहमदनगर या ठिकाणी घेण्यात आलेल्या 14 वर्षे विभागीय कबड्डी स्पर्धेत विद्या विकास मंदिर या विद्यालयाने द्वितीय क्रमांक मिळविला. स्पर्धेमध्ये विद्या विकास मंदिर विद्यालयातील प्रणव कैलास बांगर याने सर्वोत्कृष्ट रेडर हा पुरस्कार मिळविला. त्याची जिल्हा वाशिम या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निवड चाचणीमध्ये प्रणव बांगर याची निवड झाली आहे. अंकुश टाव्हरे आणि प्रविण हिंगे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.