Prajwal Revanna Case – कर्नाटकचे माजी मंत्री आणि जेडीएसचे आमदार एच.डी.रेवण्णा यांना शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. एका महिलेच्या अपहरण प्रकरणी ती कारवाई करण्यात आली. रेवण्णा हे माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांचे पुत्र आहेत.
ऐन निवडणूक काळात जेडीएसला अडचणीत आणणारे सेक्स स्कँडल प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. त्या प्रकरणावरून जेडीएसचे खासदार प्रज्वल रेवण्णा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत.
त्या प्रकरणातील एका पीडितेचे अपहरण केल्याच्या आरोपावरून प्रज्वल यांचे वडील रेवण्णा यांच्या विरोधात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर रेवण्णा यांनी अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली.
ती स्थानिक न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) देवेगौडा यांच्या घरी जाऊन रेवण्णा यांना ताब्यात घेतले.