विद्यापीठ कायद्यात दुरुस्ती करणार
मुंबई, दि. 12 – विद्यापीठांच्या आर्थिक व्यवहारावर सरकारला नियंत्रण ठेवता यावे म्हणून विद्यापीठ कायद्यात दुरुस्ती करण्याचे सरकारने ठरविले असल्याचे, शिक्षणमंत्री प्रतिभा पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या सुमारे 1700 कर्मचाऱ्यांनी संप सुरू केल्यामुळे ही दुरुस्ती करण्यात येणार आहे.
व्यवसाय कर रद्द
पुणे – महाराष्ट्र सरकारने 1975 साली वकील व इतर व्यावसायिकांवर बसविलेला व्यावसायिक कर रद्द करण्याचा हुकूम हायकोर्टाने सरकारला केला आहे.
भारताचे जपानशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित होणार
नवी दिल्ली – जपानचे परराष्ट्र मंत्री इचिरी हाटोयामा हे भारताला भेट देणार असून या भेटीमुळे भारत व जपान यांच्यात घनिष्ठ संबंध प्रस्थापित होतील, अशी अपेक्षा आहे. येथे ते 19 जुलैपासून 22 जुलैपर्यंत राहतील. भारताने जपानचे महत्त्व मान्य करण्यास भूतकाळात वेळ लावला.
जपानचे अर्थकारण आज जगात तिसऱ्या क्रमांकाचे आहे. “सरकार ही पूर्वीची “टाळाटाळ’ दुरुस्त करू इच्छिते. केवळ व्यापाराच्याचद्वारे नव्हे; तर घनिष्ठ संबंधाच्याद्वारे’, असे उद्गार नुकतेच लोकसभेत परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी काढले होते.