अभिनेत्री पूजा हेगडेच्या इन्स्टाग्राम फॅमिलीमध्ये दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. या अभिनेत्रीचे इन्स्टाग्रामवर 1.1 कोटी फॉलोअर्स झाले आहेत.
पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केले आहे, ज्यामध्ये ती योगा पोज देताना दिसत आहे. चित्रात ती लाइम ग्रीन कलरचा स्पोर्टस ब्रा आणि ग्रे कलरच्या योगा पॅंट परिधान केलेली दिसत आहे.
पूजाने फोटो शेअर करत पोस्ट केले ही, 1.1 कोटी. हे वर्ष माझ्या वाटचालीसाठी चांगले असल्याने मी हा फोटो पोस्टमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला.
नेहमीप्रमाणे मी सकारात्मकता, प्रेम, करमणूक आणि सिल्ली पोस्टच्या माध्यमातून तुमच्या सर्वांचे मनोरंजन करत राहीन.
29 वर्षीय अभिनेत्री पूजा म्हणाली की, चाहत्यांचे प्रेम पाहून मला खूप आनंद झाला. तुमचे प्रेम आणि बिनशर्त पाठिंबा मला डान्स करण्यासाठी प्रेरीत करत आहे.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास पूजा अखेरच्या वेळी अल्लू अर्जुन अभिनीत “आला वैकुंठपुरमूलू’ या तेलगू ऍक्शन ड्रामामध्ये झळकली होती. आता ती सुपरस्टार प्रभाससोबत “राधेश्याम’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट तेलगू, तमिळ, हिंदी आणि मल्याळम या चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.