पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आगामी लोकसभा निवडणूक व रमजान ईद, रंगपंचमी, होळी, शिवजयंती, गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्रीराम नवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती, असे विविध धर्मांचे धार्मिक सणांच्या अनुषंगाने कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत रुट मार्चचे आयोजन करण्यात आले होते.
सदर रूट मार्चआधी सर्व अधिकारी व अंमलदार यांना बंदोबस्ताच्या सूचना देण्यात आल्या होत्या. हा रुट मार्च कोंढवा पोलीस स्टेशन येथन सुरू करुन डावीकडे वळून कोंढवा वाहतूक विभाग- तुबा मस्जिद- सिटी लॉन्स- पारगेनगर- ओमकार गार्डन- वेल कम हॉल चौक-सरळ जाफरान हॉटेल- लाइफ लइन हॉस्पिटल- मदिना हॉटेल चौक कौसरबाग मशिद- सुप्रीम हॉटेल चौक,
एनआयबीएम रोड- मेफेर एलिंगजा सोसायटी चौक- ज्योती चौक- भीमनगर-विठ्ठल मंदिर-भैरवनाथ मंदिर -कोंढवा गावठाण कोणार्कपुरम सोसायटी- बादशहनगर सोसायटी- सत्यानंद हॉस्पिटल- आशीर्वाद चौक- शीतल पेट्रोलपंप- अशोका म्युज सोसायटीनंतर पुन्हा कोंढवा पोलीस स्टेशन असा घेण्यात आला.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उप आयुक्त आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील तसेच सी.आर. मोबाइल, तपास पथक पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार, सी.आय.एस.एफ प्लाटून यांचे उपस्थितीत पार पडला.