पुणे : पुणे शहरात एक अजब घटना घडली. ऐरवी चोराच्या मागे धावणारे पोलीस तुम्ही पहिले असेल, मात्र पोलिसांच्या मागे पोलीस तुम्ही कधी धावताना पाहिलेय का ?
पोलिसांच्या मागे पोलीस धावतानाची घटना पिंपरी- चिंचड शहरात घडली आहे. त्याचे झालं असे कि, शुक्रवार पेठ पोलीस चौकीचे बीट मार्शल पिंगळे आणि जाधव रात्री नऊच्या सुमारास बुधवार पेठेत पायी गस्त घालत होते. यावेळी त्यांना महाराष्ट्र स्पोर्टजवळ पोलीस गणवेशातील एक व्यक्ती उभा असलेला दिसला.
बीट मार्शलची पोलीस जवळ येऊ लागताच त्यांना पाहून संबंधित पळू लागला. बीट मार्शलला त्याचा संशय आल्याने त्यांनीहि त्याचा पाठलाग केला. पोलिसच पोलिसांच्या मागे धावतानाचे पाहून रस्त्यावरील नागरिक चांगलेच गोंधळात पडले.
मात्र थोड्याच वेळात संबंधीत पोलिसाला जेरबंद केल्यावर खरा प्रकार उघडकीस आला. देविदास लक्ष्मण आदक(27,रा.दिघी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई अमोल सुरेश पाटील यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
थोड्याच अंतरावर त्याला पोलिसांनी पकडल्यानंतर शुक्रवार पेठे पोलीस चौकीत आणले. त्याच्या अंगावर पोलीसांची वर्दी होती,तर डोक्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांची टोपी.
त्याला पोलिसांनी पळण्याचे कारण विचारता, त्याने आपण पोलिस नसल्याचे त्याने सांगितले. मी पोलिस असल्याचे भासवत चौकात वाहन चालकांकडून पैसे घेत असल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन न्यायालयात हजर केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत करत आहेत.
पोलीस असल्याचे भासवत केले लग्न
देविदास आदक याचे पोलीस होण्याचे स्वप्न होते. मात्र तो पोलीस भरती होऊ शकला नाही. यामुळे तो एका स्पर्धा परिक्षा केंद्रात मुलांना पोलीस भरतीचे फिजिकल ट्रेनिंगचे प्रशिक्षण देतो. त्याच्या हाताखाली प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी त्याला नेहमी तुम्ही पोलीस भरती का होत नाही ? असा प्रश्न विचारत होते.
यामुळे त्याने बोगस पोलीस होण्याचा निर्णय घेतला. त्याला ताब्यात घेतल्यावर त्याच्या घरच्यांना याची कल्पना देण्यात आली. मात्र घरच्यांनाही तो पिंपरी-चिंचवड पोलिसांमध्ये असल्याचे सांगितले.
घरच्यांना खरी परिस्थिती सांगितल्यानंतर त्यांनाही धक्का बसला. देविदासने पोलीस असल्याचे सांगत विवाह केला होता. यामुळे त्याला न्यायालयातून जामिन मिळताच पत्नी आणी नातेवाईकांनी न्यायालयाबाहेर चांगलाच चोप दिला.