पिंपरी – तळेगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे पोलिस नाईक दिलीप बोरकर (वय 36) यांचे आज रविवार (दि. 8) ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास त्यांना त्रास होऊ लागला. उपचारासाठी त्यांना देहूरोड येथील पवना हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
बोरकर हे मुळचे नांदेड जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत. बोरकर हे 2007च्या बॅचचे होते. निधनाचे वृत्त बोरकर यांच्या नातेवाईकांना कळविण्यात आले आहे. या घटनेने पिंपरी पोलिस दलात शोककळा पसरली आहे. त्यांचे मुळ गाव नांदेड जिल्ह्यातही शोक व्यक्त केला जात आहे.