पिंपरी – कुरुळी येथे कच्च्या रस्त्यावर एक पुरुष जातीचे एक दिवसाचे अर्भक आढळून आले. हा प्रकार सोमवारी (दि. 6) सकाळी दहा वाजता उघडकीस आला.
आकाश महादेव अंकुश (वय 38, रा. पिंपळे गुरव) यांनी सोमवारी (दि. 6) याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी अंकुश हे सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास कंपनीत कामावर निघाले होते.
पायी चालत जात असताना कुरुळी येथे प्रतीक लॉज शेजारी एका निळ्या कॅरीबॅगमध्ये त्यांना संशयित वस्तू आढळली. अंकुश यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी संशयित बॅग तपासली असता त्यात पुरुष जातीचे एक दिवसाचे मृत अर्भक आढळले.