भेसळीच्या पदार्थाने शिरूरकर हैराण

तालुक्‍यातील हॉटेलवर धाडसत्र राबविण्याची गरज

शिरूर – दिवाळी तोंडावर आली असताना शिरूर शहरासह तालुक्‍यातील सर्वच हॉटेल, धाबे, स्वीट होम, छोटी हॉटेलमध्ये निकृष्ट भेसळीचे पदार्थ मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. यावर अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाचा कुठलाही अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. या भेसळीच्या पदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचे दिसून येत आहे.

शिरूर तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात सध्या स्वीटहोम, हॉटेल, धाबे यांचे मोठ्या प्रमाणात जाळे निर्माण झाले आहे. यामध्ये निकृष्ट दर्जाचे तेल, पामतेल, निकृष्ट दर्जाचे बेसन, निकृष्ट दर्जाचे पालेभाज्या, आटा, मैदा, इतर पदार्थही सर्वात निकृष्ट दर्जाची वापरले जात आहे. पाच ते सात रुपयाला वडापाव, स्वस्त दरात खाद्यपदार्थ विकत आहेत. सर्व पदार्थ निकृष्ट दर्जाच्या पदार्थांतून बनवले जात आहे. स्वीट होम दुकानातील पेढे, तर सर्वच पदार्थ हेच निकृष्ट दर्जाच्या पदार्थातून बनवले जात आहे.

शिरूर तालुक्‍यातील व शहरातील एका हॉटेलमध्ये त्यांच्या किचनमध्ये झुरळे, आळ्या, उंदीर, घुशींची गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. अनेकवेळा अन्नपदार्थांमध्ये झुरळ, आळ्या आढळून येत आहे.स्वीटहोममध्ये निकृष्ट दर्जाचे पदार्थ बनवले जात आहे. बेसन पिठाच्या नावाखाली वाटाण्याच्या, व इतर पदार्थांच्या पिठातून बनवले जात आहे. हे पदार्थ बनवण्यासाठी असणारे तेल निकृष्ट दर्जाचे व स्वस्तातील असते. परराज्यातून येणारा मावा हा भेसळीचा आहे. अनेकवेळा मावामध्ये वासही येत असतो. परंतु हे हॉटेल मालक गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

एखाद्याने पदार्थ निकृष्ट दर्जाचे किंवा झुरळ आढळल्याचे दिसून आले तर केवळ त्याचे पैसे न घेता त्या ग्राहकाची समजूत काढून विषय जागच्याजागी थांबवला जात आहे. शिरूर- नगर महामार्गावरील धाब्यावर शिळे शिजवलेले मांस, मच्छीचा सर्रास वापर केला जात असल्याची चर्चा आहे. भाज्या बनवण्यासाठी असणारी ग्रेवी अनेकवेळा उघड्यावर केली जात आहे.

पोटाचे आणि घशाचे विकार बळावले – 
शिरूर तालुक्‍यातील धाबे, हॉटेल, स्वीट होमचे किचन पाहिले तर दुर्गंधीयुक्‍त आहेत. किटक असणारे किचन आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई होण्याची शक्‍यता आहे. अनेकवेळा हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोटाचे त्रास होत असतात. घशाचाही त्रास होत आहे. सर्व धाबे, हॉटेल, स्वीट होमवर संयुक्‍त कारवाई केल्यास भेसळीचा पदाफार्श होईल, असा सूर सर्वसामान्यांतून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.