पुणे – राज्यातील शिक्षकांची विविध प्रकरणे प्रलंबित आहेत. ती त्वरीत मार्गी लावून शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा असा आग्रह शिक्षक क्रांती संघटनेने शिक्षण आयुक्तांकडे धरला आहे. त्यावर शिक्षण आयुक्तांनी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक यांना शिक्षकांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावावेत, असे निर्देश दिले. तसेच शासनस्तरावरील प्रश्न सोडविणेकामी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
शिक्षक क्रांती संघटनेचे अध्यक्ष संभाजी शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांची भेट घेऊन अनेक प्रश्न मांडले.
यावेळी अर्जुन बारगजे, राजर्षी डोईफोडे, रेखा भांगे, शाम धुमाळ, पोपट वणवे, अविनाश कांबळे, आशिष गौड, सहदेव म्हस्के, जयेश मोरे, सागर फलके, संजय गावडे, सचिन बिब्बे, महावीर काळे, मीनाक्षी समगीर, पांडुरंग बडे, पुजा गायकवाड, सविता कडलक, स्वाती चौडकर, शितल शिंदे, किरण शिंदे आदी पदाधिकारीही उपस्थित होते.
विनाअनुदानित शाळा मुल्यांकन प्रस्ताव तत्काळ शिफारशीसह शासनाकडे अनुदान पात्र होण्यासाठी पाठवावेत, शिक्षणसंचालक व वेतन पथक या कार्यालयात प्रलंबित असलेले वैद्यकीय बील व इतर पुरवणी बील तत्काळ मंजूर करावेत आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत.