पिरंगुट (ता. मुळशी) – पौड पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या व सोशल डिस्टन्स न पाळलेल्या तब्बल 572 नागरिकांवर कारवाई केली. या कारवाईत त्यांच्या कडून 72 हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार विना मास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आहे. त्यानुसार पौड पोलीस स्टेशन हद्दीत भूगाव, पिरंगुट, भुकूम, घोटावडे, पौड, लवासा, मुळशी, आंबवणे, माले, घोटावडे फाटा, कासारआंबोली, उरवडे, कोळवण या गावामध्ये पूर्ण दिवसभर विनामास्क फिरणारे व सोशल डिस्टन्स न ठेवणाऱ्या 572 नागरिकांवर कारवाई केली. यामध्ये 427 नागरिकांवर भारतीय दंड संहिता कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहे. तर 145 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत बाहत्तर हजर पाचशे रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.
पौडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक रेखा दुधभाते, उपनिरीक्षक अनिल लवटे, उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र शितोळे, सिकंदर मुजावर, पोलीस कर्मचारी संदीप सपकाळ, संतोष कुंभार, अब्दुल शेख, बाबा शिंदे, मंगेश लांडगे, विनोद कांबळे, सुनील मगर, रावसाहेब गायकवाड, शंकर नवले, सागर बनसोडे, विजय कांबळे, जय पवार, नितीन गार्डी, नंदू आडारी, नितीन कदम, चंद्रशेखर हगवणे, सातेंद्र वागवले, संजय सुपे, मयुर निंबाळकर, गणेश साळुंखे, नामदेव मोरे, सुहास सातपुते, रवींद्र जाधव, प्रशांत बुणगे, विनोद चोबे, सुनील कदम, नाना मदने, प्रशांत तुरे, महेश पवार, श्रीधर जगदाळे, माहिला पोलिस शिपाई तृप्ती माकर यांनी ही कारवाई केली.