Patanjali Misleading Ad Case। पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अमानुल्ला यांच्या खंडपीठाने बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण यांना पुन्हा एकदा फटकारले. यावेळी न्यायालायने “तुमच्याकडे खूप मोठेपण आहे. आपण खूप काही केलंय. असे म्हटले आहे.
सार्वजनिकरित्या माफी मागण्यास तयार Patanjali Misleading Ad Case।
आजच्या सुनावणी दरम्यान, रामदेव बाबांच्या वकिलांकडून न्यायालयास आम्ही सार्वजनिकरित्या माफी मागण्यास तयार असल्याचे सांगितले. या माफीमुळे लोकांपर्यंत असा एक संदेश जाईल कि ज्यातून आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो असा संदेश जाण्यास मदत होईल. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने वकिलास तुम्हाला आमच्या सल्ल्याची काही गरज नसल्याचे म्हणत वकिलांना फटकारले.
दरम्यान. या सुनावणी दरम्यान, न्यायाधीश कोहली यांनी रामदेव बाबा याना हिंदीमध्ये,” तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही जे केले आहे ते योग्य होत का? किंवा तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केला आहे. त्यावर रामदेव बाबा यांनी आपण जे काही केला आहे त्यावर आपण बिनशर्त माफी मागण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
न्यायालयाचा अवमान का? Patanjali Misleading Ad Case।
न्यायमूर्ती कोहली म्हणाले की, तुमच्या वकिलाने हे सांगितले आहे. आश्वासनानंतर दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद आयोजित करताना तुमचा काय विचार होता हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. आपल्या देशात आयुर्वेद फार प्राचीन आहे. महर्षी चरक यांच्या काळातील आहे. आजीही घरगुती उपाय करतात. तुम्ही इतर पद्धतींना वाईट का म्हणता? एकच पद्धत असावी का? हे बाबा रामदेव म्हणाले की, आम्ही आयुर्वेदावर खूप संशोधन केले आहे. तर न्यायाधीश म्हणाले की ठीक आहे. तुम्ही तुमच्या संशोधनाच्या आधारे कायदेशीर आधारावर पुढे जाऊ शकता परंतु आम्हाला जाणून घ्यायचे आहे की तुम्ही या न्यायालयाचा अवमान का केला?