यवत, (वार्ताहर)- ग्रामीण भागातील सोई सुविधानी सुसज्ज असे पार्वती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आहे, असे गौरवोद्गार प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी काढले. दौंड तालुक्यातील आणि ग्रामीण भागातील रुग्णांना पार्वती हॉस्पिटलचा मोठा फायदा होणार असून सर्व रुग्णांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
दौंड तालुक्यातील चौफुला (ता. दौंड) येथे रविवार (दि.७) कै. तुकाराम खंडू धायगुडे मेडिकल फाउंडेशन संचालित ‘पार्वती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ हे रुग्णांच्या सेवेत आजपासून रुजू झाले आहे. पार्वती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन डॉ. लहाने यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी डॉ. पल्लवी धायगुडे यांनी पार्वती हॉस्पिटलतर्फे तात्याराव लहाने यांना मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात प्रदीप धायगुडे यांनी धायगुडे कुटुंबाबद्दल थोडक्यात माहीती देताना सांगितले की, आज आम्ही जे पण आहोत. ते आमचे आजोबा आणि आमचे चुलते कै. तुकाराम खंडू धायगुडे यांच्यामुळे आहोत. या उंचीपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्हाला त्यांचे मोलाचे योगदान लाभले. पण दुर्दैवाने आज ते आमच्यात नाहीत म्हणून त्यांच्या स्मृतीना धायगुडे कुटुंबाकडून उजाळा देण्यात आला.
यावेळी माजी आमदार आणि जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात यांनी हॉस्पिटलच्या उदघाट्नप्रसंगी शुभेच्छा देत धायगुडे कुटुंबाने रुग्णसेवा चालविण्याचा एक आगळावेगळा वसा घेतला आहे. त्यांच्याकडून रुग्णाची आणि समजाची सेवा घडत असल्याचे आणि अशीच उत्तम रुग्ण सेवा त्यांनी द्यावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.
भाजपाच्या महिला सरचिटणीस कांचन कुल यांनी समाजाशी नाळ जुडलेले कुटुंब म्हणून धायगुडे कुटुंबाचा उल्लेख त्यांनी केला. लहाने म्हणाले की, पार्वती हॉस्पिटलच्या डॉ. पल्लवी या निष्णात नेत्रतज्ज्ञ असून माझी शिष्य असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. संतुलित आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. बाहेरील जंक फूड खाणे टाळले पाहिजे, शरीराला आवश्यक ज्या कॅलरीज आहेत. त्याच कॅलरीज आपण आहारात घेणे आवश्यक आहे.
देशाला मधुमेहाचे आगार म्हटले जाते आहे. साडेअकरा हजार लोक डायलीसिस करतात. त्यापैकी साडेनऊ हजार लोक हे मधुमेहाने ग्रासले आहेत. त्यामुळे गोड खाणे शकतो टाळावे, यामध्ये लोक साखर बंद करून गूळ खातात. परंतु गूळ देखील तेवढाच अपायकारक असून गूळ खाणे देखील टाळावे.
यावेळी गुरुवर्य अशोक जाधव, गुरुवर्य विकासदादा पाटील, माजी आमदार रमेश थोरात, डॉ.राजेंद्र मुथा, डॉ. रमेश भोईटे, डॉ. डी. एस. लोणकर, विश्वासराव देवकाते, आनंद थोरात, वीरधवल जगदाळे, महेश भागवत, कांचन कुल ग्रामस्थ, दौंड तालुका डॉक्टर असोसिएशन व दौंड तालुका केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन दिनेश गडदे यांनी केले. प्रदीप व अविनाश धायगुडे यांनी आभार मानले.
२९ वर्षे एकाच किडनीवर
डॉ. लहाने म्हणाले की, मी आत्तापर्यंत ५० लाख रुग्ण पहिले आहेत. त्यापैकी साडेचार लाख रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत. त्यामुळेच मी २९ वर्ष झाली. एकाच किडनीवर आहे. यासाठी मी नियमित व्यायाम करतो. आहार संतुलित ठेवला आहे. माझ्या आरोग्याची काळजी मी घेत असून तुम्ही देखील याच पद्धतीने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.