मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसापासून राजकीय वर्तुळात रंगल्या आहे, अशात तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाने महाराष्ट्रात हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी बीआरएसने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती अशीही चर्चा रंगली होती. पंरतु त्यावेळी मुंडे यांच्याकडून या चर्चांवर कुठलीही प्रतिक्रिया आली नव्हती.
अशात आता बीडमध्ये पंकजा मुंडे आणि उपमुख्यंत्री एकाच व्यासपीठावर दिसतील. सहा महिन्यात देवेंद्र फडणवीस तीन वेळा बीड जिल्ह्यात आले होते. तीनही वेळा पंकजा मुंडे कार्यक्रमांना उपस्थित नव्हत्या. त्यामुळे दोन्ही नेते एका कार्यक्रमात येणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
यावर आता मीडियाशी बोलताना पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंकजा मुंडे यांनी सांगितले की,’माझ्या विषयी जर सर्व पक्ष साकारात्मक बोलत असेल तर मी त्यांच्या विषयी नकारात्मक बोलणार नाही. मला आलेल्या ऑफर बाबत मी सिरियसली विचार केला नाही. मात्र या ऑफरकडे मी बघणार नाही असे मुळीच नाही. कारण कोणत्याही व्यक्तीला सिरीयसली न घेणे हा त्यांचा अपमान असतो, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितले.