Pakistan News : पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) प्रमुख आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तोशाखाना प्रकरणात ३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांना लाहोरमधून अटकही करण्यात आली आहे. इस्लामाबाद येथील ट्रायल कोर्टाच्या या निर्णयानंतर इम्रान खानला ५ वर्षे निवडणूक लढवता येणार नाही.
In a major development, a district and sessions court convicted Pakistan Tehreek-e-Insaf (PTI) Chairman and former PM Imran Khan in the Toshakhana case, sentencing him to three years in prison, reports Pakistan’s Geo News pic.twitter.com/9vfThi7mkC
— ANI (@ANI) August 5, 2023
न्यायालयाने इम्रान खान यांना एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (ECP) तोशाखाना प्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीवरून 10 मे रोजी इम्रान खान यांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. पीटीआयने हे प्रकरण उच्च न्यायालयात नेण्याची घोषणा केली आहे.
आज झालेल्या सुनावणीदरम्यान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हुमायून दिलावर यांनी निकाल देताना सांगितले की, तोशाखाना प्रकरणात माजी पंतप्रधानांवरील आरोप सिद्ध झाले आहेत. एका पाकिस्तानी उच्च न्यायालयाने शुक्रवारी कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवला आणि इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची पुन्हा सुनावणी करण्यास सांगितले ज्यामध्ये माजी पंतप्रधानांवर सत्तेत असताना महागड्या सरकारी भेटवस्तू विकल्याचा आणि त्यातून नफा मिळवल्याचा आरोप होता.
काय आहे तोशखाना प्रकरण?
सत्ताधारी पाकिस्तानी लोकशाही चळवळीने तोशाखाना भेट प्रकरण निवडणूक आयोगाकडे उचलले होते. इम्रानने आपल्या कार्यकाळात वेगवेगळ्या देशांकडून मिळालेल्या भेटवस्तू विकल्याचं त्यांनी म्हटलं होतं. इम्रान खान यांनी निवडणूक आयोगाला सांगितले होते की, या सर्व भेटवस्तू मी तोशाखान्यातून २.१५ कोटी रुपयांना विकत घेतल्या होत्या, त्यांना विकल्यावर ५.८ कोटी रुपये मिळाले. नंतर ही रक्कम 20 कोटींहून अधिक असल्याचे उघड झाले.