Pakistan Super League, 2024 : पीएसएलचा (पाकिस्तान सुपर लीग 2024) अंतिम सामना 18 मार्च रोजी मुलतान सुलतान आणि इस्लामाबाद युनायटेड यांच्यात होणार आहे. मात्र कराचीत होणाऱ्या सामन्यापूर्वीच येथे वाद निर्माण झाला. क्रीडा पत्रकारांनी मुलतान सुलतानच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला आणि ते सर्व मध्येच निघून गेले.
Karachi Journalist boycotted Multan sultan’s press conf on manager’s misbehaviour. Journalists asked captain or senior player for conf but manager said we will not entertain according to you and if you dont want to sit, you can go .we respect every franchise and expect same pic.twitter.com/zYlGPFBhD0
— Ehsan Khan UtmanZai (@EK_UtmanZai) March 17, 2024
पाकिस्तान सुपर लीगच्या अंतिम सामन्यापूर्वी मुलतान सुलतानची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, येथील पत्रकारांना संघातील वरिष्ठ खेळाडू किंवा कर्णधाराशी बोलायचे होते. मात्र संघ व्यवस्थापकाने उद्धटपणे पत्रकारांचे ऐकले नाही व त्यांच्याशी गैरवर्तनही केले. या वादाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Karachi Journalist boycotted Multan sultan’s press conf on manager’s misbehaviour. Journalists asked captain or senior player for conf but manager said we will not entertain according to you and if you dont want to sit, you can go .we respect every franchise and expect same pic.twitter.com/zYlGPFBhD0
— Ehsan Khan UtmanZai (@EK_UtmanZai) March 17, 2024
संघ व्यवस्थापकाच्या गैरवर्तनानंतर सर्व पत्रकार उठून कॉन्फरन्स रूममधून बाहेर पडले. पाकिस्तानी पत्रकाराच्या ट्विटनुसार कराचीच्या पत्रकारांनी पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
WPL 2024 : चॅम्पियन आरसीबीवर पडला पैशांचा पाऊस…! जाणून घ्या, किती मिळाली बक्षिसाची रक्कम…
पत्रकारांनी संघ व्यवस्थापकाला कर्णधार किंवा वरिष्ठ खेळाडूला बोलावण्यास सांगितले होते, परंतु व्यवस्थापक म्हणाले, “तुम्हाला हवे तसे आम्ही तुमचे मनोरंजन करणार नाही. जर तुम्हाला बसायचे नसेल तर तुम्ही निघू शकता.”