PAK vs NZ 4th T20I Match Highlights : पाच सामन्याच्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडने सलग चौथ्या T20 मध्ये पाकिस्तानचा पराभव केला. हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी शानदार फलंदाजी करत पाकिस्तानचा धुव्वा उडवला. लक्ष्याचा पाठलाग करताना डॅरिल मिशेलने नाबाद 72* आणि ग्लेन फिलिप्सने नाबाद 70* धावा केल्या. यजमान न्यूझीलंडने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला.
New Zealand win the fourth T20I in Christchurch.#NZvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/uUHwwvCGPq
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 19, 2024
किवी संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि संघाच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय बर्याच अंशी योग्य ठरवला, जेव्हा किवी गोलंदाजांनी पाकिस्तानला 20 षटकात 5 बाद 158 धावांवर रोखले आणि उर्वरित काम फलंदाजांनी पार पाडले.
पाकिस्तान संघाकडून फलंदाजीत मोहम्मद रिझवानने 90 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली, ज्यासाठी त्याने 63 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार मारले. याशिवाय संघाच्या एकाही फलंदाजाला 25 धावांचा आकडाही पार करता आला नाही. यादरम्यान न्यूझीलंडकडून गोलंदाजीत मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. याशिवाय मिलने 1 बळी आपल्या नावावर केला. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघानं 18-1 षटकांत 3 गडी राखून विजय मिळवला.
We take a 4-0 series lead in Ōtautahi – Christchurch 🏏
A New Zealand T20I record 4th-wicket partnership (139) between Glenn Phillips (70*) and Daryl Mitchell (72*) leading the team to victory. Catch up on all scores | https://t.co/o9Xq34Wc2h 📲#NZvPAK #CricketNation pic.twitter.com/Zc7MEkou1h
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 19, 2024
न्यूझीलंड संघानं असा साकारला विजय….
विजयासाठी 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खूपच खराब झाली. किवी संघाने अवघ्या 2.4 षटकात 20 धावांवर 3 विकेट गमावल्या होत्या. या कालावधीत संघाने पहिली विकेट फिन ऍलन (08) च्या रूपाने, दुसरी टिम सेफर्ट (00) च्या रूपाने आणि तिसरी विल यंग (04) च्या रूपाने गमावली. यानंतर फलंदाजीला आलेल्या डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्सने जबाबदारी स्वीकारली आणि संघाला विजयापर्यंत नेले.
दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी 139*(93 चेंडू) धावांची भागीदारी केली. यादरम्यान, डॅरिल मिशेलने 44 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 72 धावा केल्या आणि ग्लेन फिलिप्सने 52 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 70 धावा केल्या आणि संघाला विजयाचा उंबरठा ओलांडून दिला. पाकिस्तानकडून कर्णधार शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक 3 बळी घेतले.