पुणे – देशभरातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी होणारी नीट प्रवेश परीक्षा यंदा 17 जुलै रोजी होणार असून, 543 शहरांमध्ये घेण्यात येणार आहे. ही परीक्षा इंग्रजी, मराठीसह एकूण 13 भाषांमध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी तीनतास 20 मिनिटांचा कालावधी दिला आहे.
या परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना 6 मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरण्यासाठी 7 मेपर्यंत मुदत दिली आहे. विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करायची आहे. परीक्षेच्या सविस्तर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी “एनटीए’च्या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.