बारामती(प्रतिनिधी): बारामती शहरासह तालुक्यातील लोणी भापकर (ता. बारामती) येथील एकास करोना झाला आहे. लोणी भापकर येथील संबंधित पोलीस हा लोणावळा येथे कर्तव्य बजावत होता.
मात्र, त्याच्या साथीदारास करोना झाल्याने तो शुक्रवारी (दि. 26) लोणी भापकर येथे घरी आला होता. मात्र, त्याला सर्दी, खोकल्याचा त्रास होवू लागल्याने त्याची करोना चाचणी केली असता तो पॉझिटिव्ह आला आहे.
तर शहरातील अर्बनग्राम येथे बुधवारी (दि. 1) सापडलेल्या रुग्णाचा भाऊपण गुरुवारी (दि. 2) पॉझिटिव्ह आढळल्याने गुरुवारी बारामती शहरात 1 तर तालुक्यात 1 रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे तालुक्यातील करोना बाधितांची संख्या 29वर पोहोचली आहे.