मंचर – आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर येथे सामाईक शेतातील देवाचा धार्मिक कार्यक्रमासाठी येणाऱ्या खर्चाबाबत विचारणा केल्याच्या कारणावरून दोघांनी लोखंडी गजाने मारहाण केल्याप्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिली.
घोडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तळेघरच्या हद्दीतील ममता शांताराम इष्टे यांच्या राहत्या घराच्या ओट्यावर सुरेश नामदेव इष्टे, रामदास सुरेश इष्टे (दोघे रा. तळेघर) यांनी सामाईक शेतातील देवाचा धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी येणाऱ्या खर्चाबाबत विचारल्याच्या कारणावरून मारहाण केली आहे.
यावेळी त्यांनी तसेच ममता इष्टे (वय 60, रा. तळेघर) यांच्यासह त्यांचे पती शांताराम इष्टे,मुलगा अशोक इष्टे, मुलगी सुमन गेंगजे, नातू अमोल इष्टे यांनाही लोखंडी गजाने मारहाण केली. रामदास इष्टे यांनी ही जमीन माझी असून तिथे तुम्ही पाऊल ठेवले तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी सुरेश इष्टे देऊन दमदाटी केली. याबाबत ममता इष्टे यांनी सुरेश इष्टे, रामदास इष्टे यांच्या विरोधात घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस जवान गवारी करीत आहेत.