वडूज, (प्रतिनिधी) – हिंगणे, ता. खटाव येथे श्री जानुबाई देवीची यात्रा गुरुवार दि. २३ ते शनिवार २५ अखेर संपन्न होत आहे. त्यानिमि्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. गुरुवार दि. २३ रोजी सकाळीश्री जानुबाई देवीस अभिषेक १० वाजता जय हनुमान गजी मंडळ, शेवरी जय मल्हार गजी मंडळ पळशी, मायाक्का गजी मंडळ, दोरगेवाडी यांचा गजी नृत्याचा कार्यक्रम, बारा वाजता नैवद्य व महाआरती व गजी मंडळाचा कार्यक्रम तर सायंकाळी ७.३० वाजता पालखीतून मिरवणूक काढण्यात येणार आहे.
छबीना सोबत शौर्य गजी पथक, वडूज, सनई ताफा व फटाक्यांची आताषबाजी कार्यक्रम होणार असून रात्री ११ वाजता आर्केट्रा तुफान यांचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार दि. २४ रोजी सकाळी ९ वाजता वनिता कराडकर यांचा तमाशा, जानुबाई देवीची महाआरती व दुपारी देवीची पालखी व स्थातून भव्य मिरवणूक निघणार असून सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज व श्री. त्र्यंबकानंद महाराज यांच्या हस्ते मिरवणुकीस आरंभ होणार आहे.
सायंकाळी ५ वाजता कुस्त्याचे मैदान, सायंकाळी ६ वाजता देवीचा महाप्रसाद (वांग भाकरी) तर रात्री साडे दहा वाजता वनिता कराडकर यांचा तमाशा होणार आहे. शनिवार, दि. २५ रोजी सकाळी ९ वाजता बैलगाड्यांच्या शर्यती, रात्रौ ९.३० वाजता झंकार बिटस्, कोल्हापूर यांचा कार्यक्रम होणार असून रविवार दि. २६ रोजी सायं. ७ वाजता संकष्टी चतुर्थी निमित्तमहाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.