वडूज, (प्रतिनिधी) – गणेशवाडी ( वडूज )ता. खटाव येथे दरवर्षी प्रमाणे श्री काळ भैरवनाथ यात्रा गुरुवार दि. ३० ते शनिवार १ जून अखेर संपन्न होत आहे. त्यानिमि्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.
गुरुवार दि. ३० रोजी सकाळी ७ वाजता काळभैरवनाथांचा अभिषेक, १० ते ३ या वेळेत माहेरवाशिन यांच्यासाठी होम मिनिस्टर कार्यक्रम व त्यांचा सन्मान सायंकाळी भैरवनाथांची पालखीतून मिरवणूक, छबिना सोबत डी. जे. व गंधर्व बँड आमी रात्री १२ नंतर जागर व गोंधळ होणार आहे.
शुक्रवार दि. ३१ रोजी पहाटे ५.३० वाजता देवाची लग्न, सकाळी ११ वाजल्यापासून गजी नृत्यचा कार्यक्रम, सायंकाळी आत्माराम हांडे यांचेकडून महाप्रसाद व रात्री ९ वाजता झंकार बीट्स ऑर्केस्ट्रा होणार आहे. दि. १ जून रात्री नऊ वाजता वनिता कराडकर तमाशा होणार आहे.
परिसरातील भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक सोमनाथ घाडगे, विलास पवार, सागर सजगणे, कुंडलिक राऊत, पोपट राऊत, सचिन वावरे, मनोहर साळुंखे, रमेश शिंगाडे, नवनाथ साळुंखे व यात्रा कमिटी यांनी केले आहे.