Sanjay Raut – ठाकरे गटाकडून शिवसेना आणि भाजपा २०१९ साली वेगळे झाल्यानंतर बाबरी पाडण्यात आमचाच हात होता, यावरून श्रेयवाद दिसून आला. अशात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांवर आरोप करताना दिसले. अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत उत्तर दिले आहे. या फोटोवरून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधला.
संजय राऊत म्हणाले,’देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेच्या सहभागाविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. हा अत्यंत हास्यास्पद आणि पोरखट प्रश्न आहे. अयोध्येतील लढ्यात शिवसेनेच्या योगदानाबद्दल प्रश्न विचारणे कोत्या आणि संकोचित मनोवृत्तीचं लक्षण आहे. अयोध्येतील कारसेवकांचा नाशिकमध्ये सत्कार आणि सन्मान करणार आहोत.’ त्यांच्या या टीकेवर आता देवेंद्र फणडवीस यांनी मी मुर्खांना उत्तर देत नाही. असं म्हणत प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले,’मी मुर्खांना उत्तर देत नाही. त्यामुळे त्यांना कुठलंही उत्तर नाही. मी माझ्या आनंदा करता तो फोटो ट्विट केला आहे. संपूर्ण देश हा राममय झाला आहे. मी राम भक्त आहे. मी कारसेवक आहे. मी सुद्धा राममय आहे. मी फेब्रुवारी महिन्यामध्ये निश्चितपणे कारसेवेला जाणार आहे. कारसेवा झालेली आहे. आता रामसेवेला फेब्रुवारीमध्ये आम्ही निश्चितपणे सगळेच जाणार आहोत, असं फडणवीस म्हणालेत.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत उत्तर दिले आहे. जुनी आठवण… नागपूरहून प्रकाशित होणार्या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले.’ असं म्हणत आज सकाळी आपल्या एक्स अकाऊंटवर कारसेवा करतानाचा असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.