सलमान खानचा मॅनेजर जॉर्डी पटेल “बुलबुल मॅरेज हॉल’ हा आपल्या प्रॉडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटात सलमान खान स्वतः झळकणार आहे.
या रोमॅंटिक कॉमेडीपटाचे कथानक दोन भाऊ आणि एक तरुणी यांच्याभोवती फिरणारे आहे. यातील तरुणीच्या व्यक्तिरेखेसाठी सुरुवातीला नुसरत भरुचाची निवड करण्यात आली होती. परंतु तारखांच्या समस्येमुळे तिला हा चित्रपट सोडावा लागला. आता तिच्या जागी कृती खरबंदाची वर्णी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
चित्रपट निर्मिती करणाऱ्या गटाकडून अलीकडेच तिच्याशी संपर्क साधण्यात आला. कृतीला चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली आहे. या चित्रपटात पुलकित सम्राट मुख्य नायकाच्या भूमिकेत आहे. पुलकित आणि कृतीचा हा तिसरा चित्रपट असणार आहे.
यापूर्वी “वीरेकी वेडिंग’ आणि “पागलपंती’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकले आहेत. आताच्या चित्रपटासाठीही पुलकितच्या सांगण्यावरुन-शिफारशीवरून कृतीला संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.