पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील डॉक्टरासंह कर्मचाऱ्यांचा बेशिस्तपणा तपासणी पथकाच्या पाहणीत समोर आला आहे. 76 डॉक्टरांनी हजेरीपत्रकावर सहीच केली नसल्याचे तसेच 2 डॉक्टरांनी ओळखपत्र आणि 4 डॉक्टरांनी ऍप्रन परिधान केले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे या डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना तपासणी पथकातर्फे नोटीसा देण्यात येणार आहेत.
महापालिकेचे संत तुकारामनगरमध्ये 750 खाटांच्या क्षमतेचे वायसीएम सर्वात मोठे रुग्णालय आहे. शहरासह जिल्ह्यातील विविध भागातील रुग्ण या रुग्णालयात उपचारांसाठी येत असतात. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने वायसीएम रुग्णालयात वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. वायसीएममधील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना कामावर आल्यावर बायोमॅट्रीकसह हजेरीपत्रकावर स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे.
वायसीएममधील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. त्यामुळे महापालिकेच्या तपासणी पथकाने मंगळवारी (दि.26) वायसीएम रुग्णालयाची पाहणी केली. डॉक्टर ओपीडीत हजरे होते काय? किती कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित आहेत?,
महापालिकेच्या तपासणी पथकाने वायसीएम रुग्णालयात पाहणी केली. हजेरीपत्रकावर सही न करणे, ओळखपत्र नसणे, ऍप्रन परिधान केले नसल्याचे तपासणीत निदर्शनास आले. याबाबत रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांना पत्र पाठवून शिस्त न पाळणाऱ्या डॉक्टरांसह सर्व कर्मचाऱ्यांवर आपल्या अधिकार कार्यकक्षेत कारवाई करण्याची शिफारस केली जाईल. कारवाईचा अहवाल मागविण्यात येणार आहे. यापुढेही शिस्त न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
– वामन नेमाणे, सहायक आयुक्त