नाशिक – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे आज सकाळपासून नॉट रिचेबल झाल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यांचे मोबाईल बंद असल्याचं सांगितलं जात होते. त्यामुळे त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकट नव्हता. सत्तासंघर्षाच्या निकालाला अवघे काही तास उरले असताना झिरवळे नॉट रिचेबल असल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र नॉट रिचेबल असलेले नरहरी झिरवळ आता नाशिकमध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यांना प्रतिक्रिया देखील दिली आहे.
नरहरी झिरवळ म्हणाले की, “16 आमदारांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे अपात्र ठरवण्यासंदर्भात नोटिस पाठवली होती. हा निर्णय मि घटनेला धरूनच केला आहे. आजचा निर्णयही अपात्रतेचा येईल. जर 16 आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. ते अपात्र झाल्यानंतर आपोआप मुख्यमंत्रीपद जाईल आणि सरकार कोसळेल. घटना कुणाच्या दबावाखाली बदलत नाही. त्यामुळे आज त्यांचे आमदार अपात्र होतील.”
काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ..
जय महाराष्ट्र!
😄😄 https://t.co/PQqCmfWpj8— Sanjay Raut (@rautsanjay61) May 11, 2023
तर आज सकाळीच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सूचक ट्वीट केले होते. “काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ.. जय महाराष्ट्र!” असे संजय राऊत यांनी ट्वीट करत शिंदे गटावर निशाणा साधला.