Housefull 5 – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारच्या खात्यात सध्या अनेक चित्रपट आहेत. यापैकी एक म्हणजे अक्षय कुमारचा ‘हाऊसफुल 5’, ज्याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. त्याचा हा चित्रपट 2024 मध्ये दिवाळीपर्यंत मोठ्या पडद्यावर येणार आहे.
अशात निर्मात्यांनी ‘हाऊसफुल 5’ची तयारी सुरू केली आहे. या चित्रपटात जुन्या कलाकारांसोबतच नवे चेहरेही पाहायला मिळणार आहेत. नुकतेच ‘हाऊसफुल 5’ साठी बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रींचे नाव चर्चेत आले आहे.
Can’t help but smile when the camera rolls! Day 1 in London for #KhelKhelMein, shooting begins 🎥
Need your love and best wishes 🙏🏻 pic.twitter.com/2WkEnpf67r— Akshay Kumar (@akshaykumar) October 21, 2023
रिपोर्टनुसार, प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीने अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल 5’ मध्ये एन्ट्री केली.”नोरा फतेही”चे नाव या चित्रपटासाठी फायनल झाले आहे, ती या चित्रपटात अक्षय सोबत रोमांस करतांना दिसणार आहे.
अक्षय कुमारचा ‘हाऊसफुल 5’ चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. ‘हाऊसफुल 5’ चित्रपटातील कॉमिक टायमिंग प्रेक्षकांना आजही आवडतात. सोशल मीडियावर नोरा आणि अक्षयला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे.
#WATCH | Actor-dancer Nora Fatehi walks the ramp at the launch of Jio World Plaza in Mumbai. pic.twitter.com/19IUvqW2wb
— ANI (@ANI) October 31, 2023
‘हाऊसफुल 5’ मध्ये नोरा फतेहीच्या एन्ट्रीबाबत निर्माते किंवा कलाकारांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. ‘हाऊसफुल 5’ मध्ये रवीना टंडन आणि रितेश देशमुख देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अक्षय कुमार आणि रितेश देशमुख सुरुवातीपासून ‘हाऊसफुल’चा भाग आहेत. अशात ‘हाऊसफुल 5’ मध्येही नोरला पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. हा चित्रपट तरुण मनसुखानी दिग्दर्शित करणार असून साजिद नाडियाडवाला निर्मित करणार आहेत.