Bollywood : अभिनेता अक्षय कुमारचा ‘हाऊसफुल 5’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. नुकतेच या चित्रपटाच्या रिलीज डेटची माहिती समोर आली आहे. मात्र हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना काही प्रतिक्षा करावी लागणार आहे. या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली असून आता अक्षय कुमारने या सिनेमाची नवी रिलीज डेट जाहीर केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने ही माहिती दिली आहे.
अक्षय कुमारचा ‘हाऊसफुल 5’ हा सिनेमा 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘हाऊसफुल 5’ हा सिनेमा 2024 मध्ये रिलीज करण्याचा निर्मात्यांचा प्लॅन होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. अक्षय कुमारने या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहिले की, “पाचव्यांदा मनोरंजनाचा धमाका करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. 6 जून 2023 ला सिनेमागृहात भेटू”. ‘हाऊसफुल्ल 5’ या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करत आहे. तरुण मनसुखानी या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत.
View this post on Instagram
अक्षयने यासोबत निर्माते साजिद नाडियाडवाला यांचं एक स्टेटमेंट देखील जाहीर केले आहे. यात लिहिलेलं आहे की, “हाऊसफुल फ्रेंचायझीचं यश प्रेक्षकांना माहिती आहे. आता ‘हाऊसफुल्ल 5’ला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी आशा करतो. हाऊसफुल्ल 5’ या सिनेमाचं कथानक चांगलं आहे. या सिनेमात वीएफएक्सतंत्राचाही वापर करण्यात आला आहे. ‘हाऊसफुल्ल 5’ हा सिनेमा तुमचं मनोरंजन करेल, अशी आशा करतो. याच कारणाने हा सिनेमा 6 जून 2025 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल.” यामुळे आता प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्यासाठी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.
दरम्यान, 2010 साली प्रदर्शित झालेल्या ‘हाऊसफुल्ल’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाका घातला होता. हा सिनेमा सुपरहिट ठरल्यानंतर 2012 मध्ये ‘हाऊसफुल्ल 2’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. तर 2016 मध्ये ‘हाऊसफुल्ल 3’ आणि 2019 मध्ये ‘हाऊसफुल्ल 4’ हे सिनेमाही प्रदर्शित झाला. त्यानंतर आता ‘हाऊसफुल्ल 5’ या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र 6 जून 2025 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचे अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडियाद्वारे स्पष्ट केले आहे.