पिंपरी, (प्रतिनिधी) – मालमत्ता कराच्या ऑनलाइन बिलामध्ये उपयाेग कर्ता शुल्काची रक्कम दिसत असली तरी शासनाने त्याला स्थगिती दिली आहे. त्यामुळे एकूण भरावयाची जी रक्कम आहे, ती उपयाेग कर्ता शुल्क वजा करून दर्शविण्यात आली आहे. मालमत्ता धारकांना उपयाेग कर्ता शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.
अंतिम देय रक्कम जी बिलामध्ये दर्शविण्यात आली, त्यामध्ये उपयाेग कर्ता शुल्काचा समावेश नाही. मिळकत धारकांनी आपला थकीत मालमत्ता कर तत्काळ भरावा, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात कर संकलन विभागाला एक हजार काेटींचे उदिष्ट देण्यात आले आहे. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे पाच दिवस बाकी असताना ११४ काेटींची वसुली करण्याचे आव्हान या विभागासमोर आहे.
अनेकांनी उपयाेग कर्ता शुल्क रद्द झाला असताना त्या रक्कमेचा आमच्या बिलात समावेश केला आहे. त्यामुळे आम्ही अद्याप कर भरला नसल्याचे सांगितले आहे. मात्र, ऑनलाइन बिलामध्ये उपयाेग कर्ता शुल्काची रक्कम दिसत असली तरी शासनाने हा शुल्क वसुलीला स्थगिती दिली आहे. बिलामध्ये एकूण भरावयाची जी रक्कम आहे, ती उपयाेग कर्ता शुल्क वजा करून दर्शविण्यात आली आहे.
त्यामुळे मालमत्ता धारकांना उपयाेग कर्ता शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. अंतिम देय रक्कम जी बिलामध्ये दर्शविण्यात आली आहे. त्यामध्ये उपयाेग कर्ता शुल्काचा समावेश नाही. त्यामुळे मालमत्ता धारकांनी केवळ आपला थकीत कर भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, शहरात ५ हजार ५०० लहान-माेठ्या साेसायट्या आहेत. यामधील ६५ हजार ५८३ सदनिकाधारकांकडे तब्बल १६१ काेटींचा कर थकीत आहे. त्यामुळे सदनिका धारकांनी आपल्या सदनिकेचा पाणी पुरवठा खंडित होऊ नये. त्याचबराेबर सदनिका जप्त हाेऊ नयेत, म्हणून तत्काळ कर भरावा. अन्यथा नाइलाजाने कारवाई करावी लागेल, असा इशाराही महापालिकेने दिला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात १ लाख ४८ हजार २०३ निवासी मालमत्ता आहे. या मालमत्ता धारकांना वेळाेवेळी कर भरण्याबाबत आवाहन केले. मात्र, त्यानंतरही कर न भरणा-या या मालमत्ता धारकांकडे तब्बल ३५४ काेटींची थकबाकी आहे. कर भरण्याची ऐपत असतानाही कर भरण्यास टाळाटाळ मालमत्ता धारकांनी करू नये.
याउलट थकीत करावर दंडाची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मालमत्ता धारकांचेच नुकसान हाेत असल्याने अशा थकबाकीदार मालमत्ता धारकांनी तत्काळ कर भरून शहर विकासामध्ये याेगदान द्यावे.- नीलेश देशमुख, सहायक आयुक्त, कर संकलन विभाग